नामांतर करुन म्हसवड शहरात बोस जयंती साजरी

On
नामांतर करुन म्हसवड शहरात बोस जयंती साजरी

म्हसवड : आझाद हिंद सेनेचे प्रमुख असलेले डॉ. सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेत सहभागी झालेले म्हसवड येथील हरि गोविंद रसाळ या स्वातंत्र सैनिकाने देशासाठी दिलेल्या बलीदानाची आठवण म्हणुन त्यांच्या वारसदारांनी म्हसवड येथे उभारलेल्या सदनिकेचे क्रांती निवास असे नामकरण करण्याचा सोहळा राज्यातील जेष्ठ स्वातंत्र्य सैनिकांच्या व त्यांच्या वारसदारांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी भारतीय स्वातंत्र्य अमृतमहोत्सव

म्हसवड : आझाद हिंद सेनेचे प्रमुख असलेले डॉ. सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेत सहभागी झालेले म्हसवड येथील हरि गोविंद रसाळ या स्वातंत्र सैनिकाने देशासाठी दिलेल्या बलीदानाची आठवण म्हणुन त्यांच्या वारसदारांनी म्हसवड येथे उभारलेल्या सदनिकेचे क्रांती निवास असे नामकरण करण्याचा सोहळा राज्यातील जेष्ठ स्वातंत्र्य सैनिकांच्या व त्यांच्या वारसदारांच्या उपस्थितीत पार पडला.

यावेळी भारतीय स्वातंत्र्य अमृतमहोत्सव समितीचे अध्यक्ष संपतराव जाधव, स्वा. सैनिक बाबुराव हिराजी मुठुकळे ( बीड ), नामदेव काशीद ( दहिवडी ), कस्तुराबाई जगदाळे, ( बिदाल ), वैजयंता अवघडे ( दहिवडी ), सुदाम जगदाळे ( शिरवली ), प्रल्हाद शिंदे, नेताजी माने, देवीदास डमकले, गणेश गायकवाड, यासह नगरसेवक गणेश रसाळ, माजी नगरसेवक सर्जेराव माने, नगरसेविका शोभा रसाळ, रंजना रसाळ आदीजण उपस्थित होते.

१९४३ साली नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी सिंगापूर येथे “आझाद हिंद सेनेची”स्थापना करताना जगातील हिंदुस्तानी जनतेला आवाहन केले होते तुम मुझे खून दो। मैं तुम्हे आझादी दुंगा

त्यावेळी म्हसवडचे सुपुत्र श्री हरी गोविंद रसाळ यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आवाहनाला साथ देऊन १९४३ साली सिंगापूर येथे आझाद हिंद सेनेत” सहभाग घेतला होता, याची दखल घेवुन

१५ आगस्ट१९४७ साली भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आझाद हिंद सैनिक हरी गोविंद रसाळ याना १५  आगस्ट १९७२ रोजी ताम्रपट व स्वातंत्र्य सैनिक सन्मान बहाल केला होता. या दिनाची आठवण  नवीन पिढीला रहावी याकरीता भारतीय स्वातंत्र्य अमृतमहोत्सव समिती महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष संपतराव जाधव यांनी २३ फेब्रुवारी या सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती निमित्त म्हसवड येथील तत्कालीन हिंद सैनिक हरि गोविंद रसाळ यांच्या वारसदारांनी बांधलेल्या वेणु सदन या निवासाचे क्रांति सदन असे नामकरण करुन बोस यांची जयंती अनोख्या पध्दतीने साजरी केली, यावेळी माण – खटाव तालुक्यातील स्वातंत्र्य सैनिकांसह राज्यभरातील स्वातंत्र्य सैनिक व त्यांचे वारसदार उपस्थित होते, या वारसदारांचा रसाळ कुटुंबियांकडुन गौरवही  करण्यात आला.

वेणु सदन निवासाचे झाले क्रांती सदन 

सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमीत्त त्यांच्याच आझाद हिंद सेनेतील १९४३ साली हिंद सैनिक असलेल्या म्हसवड येथील हरि गोविंद रसाळ यांच्या वारसदारांनी बांधलेल्या वेणु सदन या निवासस्थानाचे यावेळी क्रांती सदन असे नामकरण करण्यात आले.

 

स्वातंत्र्य सैनिकांच्या हस्ते कँलेंडरचे अनावरण

डॉ. सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती निमित्त काढण्यात आलेल्या दिनदर्शिकेचे यावेळी उपस्थित स्वातंत्र्य सैनिकांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

वंदे मातरम्, भारत माता की जय च्या घोषणांनी परिसर दणानला

स्व. स्वातंत्र्य सैनिक हरि गोविंद रसाळ यांच्या पत्नी श्रीमती वेणु रसाळ यांच्या उपस्थितीत उपस्थित स्वातंत्र्य सैनिकांनी वंदे मातरम् व भारत माता की जय च्या घोषणांनी परिसर दणाणुन सोडला.

Share this post

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

Latest News

Follow us