Citizens PMRDA

On

पुणे शहराची वाढ झपाट्याने होत आहे, हे आपणास ज्ञात आहेच. एकीकडे शहर मेट्रोसाठी सज्ज होत असतांना शहरातील वाहतुकीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. शहराच्या वाढत्या विस्ताराला लक्षात घेता येत्या काळातील पायाभूत सुविधांचा संतुलित विकास व नियोजनाची गरज पुन्हा अधोरेखित होत आहे. हे सर्व लक्षात घेऊन केवळ शहराचाच नव्हे जिल्ह्याचाही संतुलित विकास व्हावा, यासाठी राज्य सरकारने

पुणे शहराची वाढ झपाट्याने होत आहे, हे आपणास ज्ञात आहेच. एकीकडे शहर मेट्रोसाठी सज्ज होत असतांना शहरातील वाहतुकीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. शहराच्या वाढत्या विस्ताराला लक्षात घेता येत्या काळातील पायाभूत सुविधांचा संतुलित विकास व नियोजनाची गरज पुन्हा अधोरेखित होत आहे. हे सर्व लक्षात घेऊन केवळ शहराचाच नव्हे जिल्ह्याचाही संतुलित विकास व्हावा, यासाठी राज्य सरकारने मे 2015 मध्ये पुणे महानगर क्षेत्र प्राधिकरणाची (पीएमआरडीए) स्थापना केली आहे. पुणे महानगर क्षेत्रात म्हणजेच पीएमपीआरडीच्या क्षेत्रात सर्वांगिन संतुलित विकास झाला तर, पुणे शहरावरचा ताण कमी होईल आणि लगतच्या परिसरातील नागरिकांचेही जीवनमान उंचावेल.

शहराचे सुजाण नागरिक या नात्याने शहराच्या सुनियोजित भविष्याच्या प्रक्रियेत सहभागी होण्याच्या उद्देशाने आम्ही “सिटिझन्स पीएमआरडीए’ हा एक अभ्यासगट स्थापन केला आहे. वास्तूविशारद, अभियंते यांच्यासह नगर नियोजन, माध्यमं, पर्यावरण, उर्जा आदी विविध क्षेत्रातील तज्ज्ञांचाही या गटात समावेश आहे. वाहतूक व्यवस्था, प्रदूषण, पाणी पुरवठा, कचरा-सांडपाणी व्यवस्थापन आदींबाबत अभ्यास करून काही उपाययोजना गटातील सदस्यांनी संबंधित शासकीय विभागांना सादर केल्या आहेत.

पुणे शहर आणि पुणे महानगर क्षेत्रातील नागरीकरणाची प्रक्रिया लक्षात घेऊन, २०६० पर्यंत एकूण नगर नियोजन करावे लागणार आहे. विविध पैलूंच्या माध्यमातून त्याचा वेध घेण्यासाठी “सिटिझन्स पीएमआरडीए’ ने १३ आणि १४ जानेवारी रोजी “व्हिजन पुणे २०६०” हे सादरीकरण आयोजित केल आहे. पुणे शहर, पुणे महानगर क्षेत्रातील वाहतूक, नगर नियोजन, विकास नियंत्रण नियमावली (डिसी रूल), उद्योग-व्यवसाय आदींबाबत अभ्यास गटाचे सदस्य सादरीकरण करणार आहे. सध्याच्या समस्या आणि त्या सोडविण्यासाठी उपाययोजना, असे त्याचे स्वरूप असेल. यादरम्यान प्रदर्शनही आयोजित करण्यात आले आहे.

डेक्कन जिमखान्याजवळील – गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्‍स अँड इकॉनॉमिक्‍स या संस्थेच्या काळे मेमोरियल हॉलमध्ये १३ आणि १४ जानेवारी रोजी दोन सत्रांत हे सादरीकरण होणार आहे. त्यात पुणेकरांनीही चर्चेद्वारे सहभागी व्हायची संधी मिळणार आहे. पुणे शहर आणि पुणे महानगरचे नियोजन नेटके व्हावे त्यातून संपूर्ण पुण्याचा नियोजीत विकास होऊन नागरिकांचे जीवनमान उंचावेल, या उद्देशाने आयोजित केलेल्या “व्हिजन पुणे २०६०” यासाठी आपण उपस्थित रहावे, ही नम्र विनंती.

———–
स्थळ: काळे मेमोरिअल हॉल, गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्‍स अँड इकॉनॉमिक्‍स, पुणे 411004
———–
सत्र 1: पुणे शहर – शनिवार – 13 जानेवारी 2018 – सायंकाळी 6 वाजता
सत्र 2: पुणे जिल्हा आणि पुणे महानगर क्षेत्र – 14 जानेवारी 2018 – सकाळी 10 वाजता
————-
तपशीलासाठी संपर्क: नितांत माटे (9822016433), हेमंत साठ्ये (9371005823), विनय हर्डिकर (9890166327)
————-

Share this post

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

Latest News

Follow us