पी.एम किसान योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घावा : उमेश घोडगे

राजेगाव / प्रतिनिधी बँक ऑफ महारष्ट्र तर्फे कृषी निघडीत कामांसाठी कर्ज सहाय्यता दिले जाणार आहे. नुकतेच पी.एम किसान योजने अंतर्गत ज्या शेतकरी बांधवांनी कोठेच पिक कर्ज घेतले नाही त्यांना भिगवण शाखेंतर्गत पीककर्ज उपलब्ध करून दिले जाणार असल्याची माहिती शाखा व्यवस्थापक उमेश घोडके यांनी दिली. शेतकरी आर्थिक अडचणीत येऊ नये. त्याला शेतीसाठी आर्थिक मदत मिळावी आणि

पी.एम किसान योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घावा : उमेश घोडगे

राजेगाव / प्रतिनिधी 

बँक ऑफ महारष्ट्र तर्फे कृषी निघडीत कामांसाठी कर्ज सहाय्यता दिले जाणार आहे. नुकतेच पी.एम किसान योजने अंतर्गत ज्या शेतकरी बांधवांनी कोठेच पिक कर्ज घेतले नाही त्यांना भिगवण शाखेंतर्गत पीककर्ज उपलब्ध करून दिले जाणार असल्याची माहिती शाखा व्यवस्थापक उमेश घोडके यांनी दिली.

शेतकरी आर्थिक अडचणीत येऊ नये. त्याला शेतीसाठी आर्थिक मदत मिळावी आणि खरीप हंगामाची शेतीमशागत करता यावी यासाठी शेतकऱ्यांना अल्पावधीत पिक कर्ज कसे उपलब्ध करून दिले जाईल याकडे बँक ऑफ महाराष्ट्र भिगवण शाखेतील कर्मचारी अधिक प्रयत्न करत आहे. कोरोनाच्या विषाणूजन्य परिस्थितीमुळे आर्थिक अडचणीचा सामना करण्यसाठी नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना महाबँक किसान राहत योजनेंतर्गत तत्काळ पिक कर्जाच्या पन्नस टक्के किवा जास्तीत जास्त एक लाखापर्यंत वित्तसहाय्य केल जाणर आहे.

परिसरातील शेतकरी बंधावणी योजनेचा अधिक लाभ घेण्याचे आव्हान आणि बँकेच्या इतरही सुविधांचा लाभ नागरिकांनी घ्यावा असे महाबँक ग्रामीण विकास केंद्राचे कृषी अधिकारी अमोल कड, कृषी सहाय्यक देविदास फलफाले यांनी सांगितले.

ooo

Tags:

About The Author

Advertisement

Latest News